आपण लॉग इन नाही.
लॉग इन

लॉग इन

द इंडिया कॉलेज ऑफ मिनिस्ट्री (आयकॉम) ही ग्लोबल युनिव्हर्सिटी पाठशाळा असून ती जगातील दूरशिक्षण पद्धतीने ईश्वरविद्या शिकवणारी मुख्य शिक्षणसंस्था आहे. भारतामध्ये देवाच्या राज्याचा विस्तार होण्यासाठी त्याने आपला उपयोग करुन घ्यावा अशी इच्छा असणाऱ्या कार्यमग्न ख्रिस्ती लोकांसाठी हा अभ्यासक्रम तयार केला आहे. यामध्ये सी. टीएच. आणि डिप. टीएच. हे दोन अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम तीन प्रकारात उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहज परवडणारे शुल्क देऊन केव्हाही व कुठेही सेवेसाठी सज्ज होता येते. तुमचे जीवन आणि कार्य यांच्याविषयीचे देवाचे स्वप्न पूर्ण करणे तुमच्याच हातात आहे.

मी नावनोंदणी कसं करू शकतो?

तुमच्या जवळच्या असेंब्लीज ऑफ गॉड मंडळीशी संपर्क करा किंवा आमची वेबसाइट Globaluniversityindia पहा. तेथून तुम्ही नोंदणी करु शकता. 

  • आमच्या वेबसाइटवरुन माहितीपत्रक मिळवून ते भरुन द्या.
  • नमुना अर्ज वेबसाइट वरुन डाऊनलोड करुन तो भरा आणि पुढील इ-मेल पत्त्यावर पाठवा admissions@guindia.com.
  • आणखी माहिती किंवा मदत हवी असेल तर तुमच्या जवळच्या ए.जी. मंडळीच्या पाळकांना भेटा.
  •  वाटल्यास admissions@guindia.com येथे आमच्याशी संपर्क साधा :

किंवा फोन करा
८८८ ३३७० ८८८
८८८ ३३७९ ८८८

प्रवेश अर्ज

 

आपल्या मंडळीचा गुणाकार करा

तुमचे शहर व राष्ट्र  यांच्यापर्यंत सुवार्तासंदेश पोचवण्यासाठी तुमची मंडळी देवाचे प्रमुख साधन आहे. तुमची मंडळी वाढावी, त्यातून नव्या मंडळ्या याव्या ही देवाची इच्छा आहे. हे कसे घडणार?

        द असेंब्लीज ऑफ गॉड ह्यांनी २०२० पर्यंत २५,००० नव्या मंडळ्या रोपण करण्याचे प्रगतिशील उद्दिष्ट समोर ठेवले आहे. नव्या गृहमंडळ्या स्थापन करणे हीच हे उद्दिष्ट साध्य करण्याची किल्ली आहे. आरंभीच्या मंडळीप्रमाणे स्थानिक मंडळी मधील विश्वासणाऱ्यांनी आपले मित्र व शेजारी ह्यांच्यापर्यंत सुवार्ता संदेश पोचेल हे पाहणे आमचे कर्तव्य आहे.

        तुमच्या मंडळीतील प्रत्येक घरामध्ये मंडळी होण्याची सुप्त शक्ती आहे. पण हे साध्य होण्यासाठी प्रशिक्षित पुढारी हवा, हीच याची किल्ली आहे. हा पुढारी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाचे वचन शिकवील आणि लोकांना साहाय्य करील. गृहमंडळीतील पुढारी प्रशिक्षण कार्यक्रम देण्यासाठी ग्लोबल युनिव्हर्सिटीने द असेंब्लीज ऑफ गॉड ऑफ इंडिया बरोबर भागीदारी केली आहे. त्यांनी गृहमंडळी पुढारी प्रशिक्षण कार्यक्रम द इंडियाकॉलेजऑफमिनिस्ट्री (आयकॉम) सुरु केला आहे.